समाजवादी स्मृती
भाबडे अर्थशास्त्रः १)मे २००५ चा आजचा सुधारक गिरणी विशेषांक म्हणून निघाला आहे. यातील काही भागाबद्दल “संघटित क्षेत्रातील १२-१५ टक्के श्रमिक सोडल्यास इतरांना कामावरून काढल्यास नुकसानभरपाई मिळत नाही. दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था ६.५ ते ७ % दरम्यान विकासदर नोंदवून मुक्तपणे व लक्षणीय प्रमाणात जागतिक पातळीचे अब्जाधीश निर्माण करीत आहे. म्हणजे निर्माण होणारी सम्पत्ती कोणत्या दिशेने वाहत आहे …